Home स्पोर्ट महेश माणगावकरला स्क्वॉश स्पर्धेचे राष्ट्रीय जेतेपद!

महेश माणगावकरला स्क्वॉश स्पर्धेचे राष्ट्रीय जेतेपद!

134

मसूरे प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील मोंड गावचा सुपुत्र, अर्जुन पुरस्कार विजेता राष्ट्रीय स्क्वॉश खेळाडू महेश माणगावकर याने बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुल्या अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

मुंबईतील बॉम्बे जिमखान्याच्या कोर्टवर झालेल्या अंतिम फेरीत गतविजेत्या माणगावकरने आपल्या कामगिरीत सातत्य कायम राखताना महाराष्ट्राच्याच अव्वल मानांकित वीर चोटरानीवर  ११-९, ११-६, ६-११, ११-६ असा दणदणीत विजय मिळवला.

२०२२ मध्ये संपन्न झालेल्या आशयाई स्पर्धेत याच खेळातील सांघिक कास्य पदक मिळवणाऱ्या चमूत माणगावकर याचाही समावेश होता. महेश माणगावकर यांच्या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.