Home राजकारण महाराष्ट्र राज्यातील राजकारणाबाबत देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट….

महाराष्ट्र राज्यातील राजकारणाबाबत देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट….

75

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात बोलताना अनेक प्रश्नांना बेधडकपणे उत्तरे दिली आहेत. त्यांनी यावेळी अनेक गोप्यस्फोट केली. सकाळचा शपथविधी पासून राज्यातील सत्तांसतापर्यंत काय काय घडलं? याबाबत त्यांनी बेधडकपणे उत्तरे दिली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनाच व्हिलन ठरवलं आहे.‘माझ्यासोबत २ वेळा विश्वासघात’…..देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्यासोबत विश्वास घात झाला. तो ही दोन वेळा झाला. पहिल्यांदा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला. आमच्यासोबत निवडणुका लढल्या, आमच्या सोबत निवडून आले.मोदीजी म्हणाले फडणवीस मुख्यमंत्री होतील तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. अमित शाह म्हणाले तेव्हा टाळ्या वाजवत होते. स्वत:ही म्हणाले होते. पण नंतर ज्यावेळी नंबर लक्षात आले. त्यांना वाटलं मुख्यमंत्री होता येईल तेव्हा त्यांनी माझा फोन ही घेतला नाही. मुख्यमंत्रीची खुर्ची इतकी प्रिय झाली की ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत निघून गेले.शरद पवारांसोबतच चर्चा झाली होती’….

दुसऱ्यांदा विश्वासघात झाला तेव्हा मी त्यांना दोष देत नाही. कारण ते आमच्यासोबत लढले नव्हते.ज्यावेळी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरु होती. तेव्हा आमच्याकडे ऑफर आली स्टेबल गर्व्हमेंट स्थापन करण्याची. जी काही चर्चा झाली ती शरद पवार रयांच्यासोबत झाली होती. गोष्टी ठरल्यानंतर त्या नंतर कशा बदलल्या हे सगळ्यांनी पाहिलं आहे. दुसऱ्यांदा असा विश्वासघात झाला होता.’या दोघांनी आमच्यासोबत जशी वागणूक दिली होती. तेव्हा त्यांच्यापक्षात जेव्हा कुरघोडी झाली तेव्हा आम्ही त्याची संधी घेतली. त्यामुळे मी बदला यासाठी हा शब्द वापरला. अजितदादांचं बंड होतं का? हाच प्रश्न आहे. अजितदादांना काही कमेंट करु द्या मग त्याला उत्तर मी देईल.अजितदादा यांनी फसवणुकीच्या भावनेतून शपथ घेतली नव्हती. पण नंतर ते तोंडघशी कसे पडले? हे नंतर ते सांगतील. असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.