Home स्टोरी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या’ माध्यमातुन मोफत व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या’ माध्यमातुन मोफत व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

153

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: रविवार दि.२१ मे रोजी स्नेहवर्धक मंडळ या ठीकाणी देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन श्री.संतोष मयेकर यांच्या संकल्पनेतून देवगड तालुक्यातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ज्वेलरी व राखी बनवुन त्या व्यवसायातुन अर्थार्जन करण्याच्यादृष्टीने मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तालुक्यातील महिलांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दर्शविला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्यक्षा आणि प्रवक्त्या मान.सौ.अनिषा माजगांवकर ताई, माजी नगरसेविका श्रीम.सरफरे ताई, आणि अणुशक्ती नगरच्या महीला विभाग अध्यक्षा सौ. प्रांजल राणे ताई या सर्व महीला पदाधिकारी आवर्जून हजर होत्या. तसेच सौ.सुर्वे ताई यांनी सर्व महिलांना या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले.