वेंगुर्ले प्रतिनिधी: आज दुपारी बारा वाजता महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकर यांनी त्यांचे ग्रामदैवत श्री देवी सातेरे मातोंड तालुका वेंगुर्ला येथे दर्शन घेऊन देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी मातोंड गावच्या वतीने श्री दादा परब व त्यांचे सर्व सहकारी, मानकरी, सरपंच, प्रांताधिकारी,तहसीलदार, वेंगुर्ला पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी. माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले यानी उपस्थित राहून सन्माननीय अध्यक्ष यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील राजकीय जीवनात यशस्वी होण्याबाबत सदिच्छा दिल्या.
यावेळी बोलताना सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी श्रीदेवी सातेरी च्या आशीर्वादाने आपले सर्व कुटुंबीय ऋणी असल्याचे सांगितले. तसेच यापुढेही आपण विधानसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला योग्य न्याय देण्याच्या बाबतीत कार्य तत्पर राहीन. हे करत असताना माझ्या कोकणच्या शेवटच्या माणसाला न्याय मिळेल. तसेच कोकण साठी पर्यावरणाला धोका न पोहोचवणारे, पर्यटन व्यवसायाला तसेच इतर लहान उद्योगांना चालना देण्यासाठी आपण आपल्या पदाचा सर्वतोपरी उपयोग करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने श्री दादा परब यानी सन्माननीय अध्यक्ष मतोंड गावचे सुपुत्र असल्याचा आम्हा ग्रामस्थांना अभिमान आहे व आपल्या सर्वांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. असा विश्र्वास व्यक्त केला. या छोटेखानी समारंभात बोलताना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सत्ता बदलाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशा नुसार जो महत्वपूर्ण निर्णय दिला. त्याची नोंद इतिहासात राहील व यापुढे ज्याप्रमाणे मागील शिंदे सरकार स्थापन झाले व पुन्हा देशात इतर कोणत्याही राज्यात असे सरकार आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्या वेळेला सन्माननीय राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय सर्व राजकीय पक्षांना एक इशारा वजा दिशा देणारा निर्णय आहे व त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. सन्माननीय अध्यक्ष यांचा वरील निर्णय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालां व इतर महाविकास आघाडीच्या पक्षांना जरी अन्यायकारक त्यावेळी वाटला असला, तरी सुद्धा दोन्ही बाजूंच्या पक्षांना काही प्रमाणात सांभाळून घेण्याचे कसबही अध्यक्षांनी साधले आहे. असे दिसून आले आहे. देशांमध्ये सर्वात तरुण विधानसभेचे अध्यक्ष म्हणून प्रवीण भोसले यांनी त्यांचा या समारंभामध्ये गौरव केला.