Home क्राईम महाराष्‍ट्रात गोवंश हत्‍या रोखण्‍यासाठी कडक उपाययोजना करा! विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर

महाराष्‍ट्रात गोवंश हत्‍या रोखण्‍यासाठी कडक उपाययोजना करा! विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर

107

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: गोवंश हत्‍या रोखण्‍यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्‍यात यावी. भरारी पथकांची स्‍थापना करून अवैध पशू वाहतूक रोखण्‍यात यावी. त्‍याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्‍याच्‍या, आक्रमणांच्‍या वाढत्‍या तक्रारींची तात्‍काळ चौकशी करून प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्‍यात यावेत, असे निर्देश विधानसभेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता राहुल नार्वेकर यांनी पोलिसांना दिले आहेत.

असे निर्देश का द्यावे लागतात?-

२६ जून या दिवशी राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ येथे गोहत्‍या रोखण्‍याविषयीची उच्‍चस्‍तरीय बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्‍त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्‍यवस्‍था) आणि गोरक्षा समितीचे पदाधिकारी उपस्‍थित होते.नांदेड जिल्‍ह्यातील किनवट येथे समाजकंटकांनी केलेली गोरक्षकाची हत्‍या या पार्श्‍वभूमीवर गोरक्षकांच्‍या हत्‍या रोखणे, तसेच गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंदवले जाणार नाहीत, याची दक्षता घ्‍यावी, असे निर्देशही दिले. या बैठकीला अतिरिक्‍त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्‍यवस्‍था) संजय सक्‍सेना आणि नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्‍ण कोकाटे, पशू कल्‍याण मंडळाचे कमलेश शाह, विश्‍व हिंदु परिषदेचे महाराष्‍ट्र गौशाळा संपर्कप्रमुख श्री. लक्ष्मीनारायण चांडक, गोरक्षा आणि गोसेवा क्षेत्रात कार्य करणारे डॉ. विनोद कोठारी, रमेश पुरोहित, अधिवक्‍ता राजू गुप्‍ता, अधिवक्‍ता सिद्धविद्या यांसह अन्‍य गोरक्षक उपस्‍थित होते. येत्‍या १० दिवसांत कार्यवाहीचा आढावा घेण्‍यासाठी पुन्‍हा बैठक घेण्‍यात येणार आहे.