Home राजकारण महाराष्ट्रात अराजकता निर्माण करून, अशांतता करण्याचं काम मिंधे सरकार करत आहे! चंद्रकांत...

महाराष्ट्रात अराजकता निर्माण करून, अशांतता करण्याचं काम मिंधे सरकार करत आहे! चंद्रकांत खैरे

51

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात मोठा राडा झाला आहे. यामध्ये पोलिसांची आणि नागरिकांची वाहने जाळली गेली आहेत. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील किराडपुरा येथे घडली. यावेळी जमावाला आवर घालण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. याप्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, “महाराष्ट्रात अराजकता निर्माण करून, अशांतता करण्याचं काम मिंधे सरकार करत आहे. मी मंत्री असताना पाच वर्षात एकही दंगल झाली नाही. पण, सध्याच्या गृहमंत्र्यांचं लक्ष नाही. गृहमंत्री आणि मिंधे सरकारचं हे अपयश आहे. हे फक्त त्यांचे खोकेवाले लोक सांभाळतात, यांना जनता सांभाळता येत नाही.२ एप्रिलला महाविकास आघाडीचा मेळावा आहे. त्यात विघ्न आणण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न आहे. एमआयएमला उचकवून देण्याचं काम करण्यात येत आहे. एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे, असं सर्व लोक म्हणत आहेत. महापालिका, विधानसभा, लोकसभा, जिल्हापरिषद निवडणुकांसाठी हे सर्व सुरू आहे. याचा मास्टमारईंड देवेंद्र फडणवीस आहेत. तर, भागवत कराड आणि जलील हे मित्र आहेत. त्यांचं हे प्लॅनिंग सुरू आहे. असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.