मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मालवण तालुक्यातील महान गावातील वीज समस्या बाबत सरपंच अक्षय तावडे यांनी वीज वितरण कंपनीच्या मालवण कार्यालयास निवेदन देत वीज लाईन लगतची झाडे तोडण्याची मागणी केली आहे. निवेदन नुसार महान गावामधील वीज वाहिन्यांना टेकणान्या झाडाच्या फांदा अद्यापपर्यंत तोडल्या नाही आहेत. पावसाळा सुरु होणार असून त्यापूर्वी वीज वाहिन्यांना टेकणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे आवश्यक आहे. महान गावासाठी सद्यस्थितीत मालवण विज केंद्रातून विज जोडणी दिलेली आहे. परंतु पावसाळ्यामध्ये कोणत्याही कारणास्तव विज गेल्यास विज कनेक्शन धारकांची गैरसोय होते.
शासकीय नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करता येत नसल्याने नळकनेक्शन धारकांची गैरसोय होते. यासाठी पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीमध्ये विजपुरवठा मालवण विज केंद्रावरून खंडित झाल्यास तातडीने कणकवली विजकेंद्रावरून येणाऱ्या लाईन ने विज जोडणी देण्याची मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी उपसरपंच अजित राणे, माजी प स सदस्य सुधीर साळसकर, सागर शिंदे, प्रसाद जाधव, निळकंठ घाडी, मंगेश साळसकर, मदन घाडी, संग्राम साळसकर, सुहास साळुंखे, शामा घाडी आदी उपस्थित होते.