Home स्टोरी महागाई ,आरोग्य यंत्रणाचा अभाव, शैक्षणिक व्यवस्था आणि बेरोजगारी याकडे सर्वपक्षीय नेत्यांना लक्ष...

महागाई ,आरोग्य यंत्रणाचा अभाव, शैक्षणिक व्यवस्था आणि बेरोजगारी याकडे सर्वपक्षीय नेत्यांना लक्ष द्यावे! रवी जाधव

62

सिंधुदुर्ग: सन्माननीय सर्वपक्षीय नेत्यांना व त्यांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना नतमस्तक होऊन एक विनम्र आवाहन करतो की, आपण सावंतवाडी मंगळवार आठवडा बाजार या एकाच विषयावर फोकस न करता दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई ,आरोग्य यंत्रणाचा अभाव, शैक्षणिक व्यवस्था आणि मोठा आणि सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे बेरोजगारी. या युवापिढीच्या मूलभूत गरजांवरही जरासा फोकस केला तर आमच्यासारख्या युवाबेरोजगार तरुणांना दिलासा मिळू शकेल. सावंतवाडी शहरातील मंगळवारचा आठवडा बाजार आणि मोती तलावाचा काठ याही व्यतिरिक्त नागरिकांच्या अनेक समस्या व प्रश्न आहेत असे प्रश्न वेळीच मार्गी लागणे गरजेचे आहे कारण आजच्या व्यवस्थेला व परिस्थितीला सर्वसामान्य माणूस फार वैतागून गेलेला आहे. युवा पिढीसमोर जीवन कसं जगवावं हा एक मोठा प्रश्न उभा आहे आणि हा कधी कधी न सुटणारा प्रश्न एखाद्याला “आत्महत्या” अशा टोकाच्या भूमीकडे घेऊन जाताना दिसत आहे. साहेब,काही झालं तरी युवा पिढी जगली पाहिजे कारण युवा पिढी आपल्या भारत देशाचे भविष्य आहेच तसेच आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांचा आधार पण आहे याही गोष्टींचा गांभीर्याने विचार करता येईल का बघा कारण आपल्याजवळ तेवढी पावर आहे म्हणून तसा प्रयत्न कराल तर युवा पिढीवर आपले फार मोठे उपकार होतील एवढच सांगू इच्छितो साहेब. यात माझं काही चुकलं असल्यास क्षमा असावी धन्यवाद. श्री रवी जाधव (सामाजिक बांधीलकी सावंतवाडी)