Home स्टोरी मसुरे येथे भरतेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव साजरा..

मसुरे येथे भरतेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव साजरा..

241



मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम…. अशा नामघोषात मसुरे देऊळवाडा येथील श्री देव भरतेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात हजोरो भविकांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.
मसुरे गावचे ग्रामदैवत तसेच ३६० खेड्यांचा अधिपती जैन श्री देव भरतेश्वर मंदीरात रामनवमी उत्सव याही वर्षी साजरा होताना विविध धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिसून आला.


या उत्सव काळात सकाळी ६ वा. श्रीची विधिवत पूजा आर्च्या करण्यात आली,९ते १२ या वेळेत पुरोहित श्री सुधाकर जोशी यांनी पुराण वाचन केले, श्री रामजन्म व कथा कीर्तन श्री शेखर पाडगावकर यांनी सादर केले ,मध्यान्ह दुपारी १२ वा. रामजन्म सोहळा, रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम! या नामघोषात परिसर मंत्रमुग्ध झाला होता. तदनंतर मंदिराच्या भोवताली  श्रीची शाही पालखी प्रदक्षिणा ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पार पडली. उपस्थित भविकांना मंडळाकडून प्रसाद म्हणून सुंठवडा व महाप्रसाद देण्यात आला.या कार्यक्रमाला गावचे सर्व मानकारी, ग्रामस्थ, भक्त व दशक्रोशितिल हजारो भाविक उपस्थित होते.

फोटो क्याप्शन:


मसुरे देऊळवाडा

मसुरे देऊळवाडा येथील श्री देव जैन भरतेश्वर मंदिरातल रामनवी उत्सवातील राम जन्माच्या  वेळी भाविकांची गर्दी.