मसुरे प्रतिनिधी: श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट, पेडणेकर बंधू मसुरे कावावाडी व विजय क्रीडा मंडळ मुंबई यांच्या वतीने मसुरे कावावाडी येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचा १३० जणांनी लाभ घेतला. १०४ जणांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. शिबिराचे उदघाटन विजय क्रीडा मंडळ अध्यक्ष संतोष कासले यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष शरद पेडणेकर, डॉ दत्ताराम कोरडे, डॉ यादव, शाम धुरी, ऍड केदार जुवेकर, राजन मालवणकर, नारायण पेडणेकर, विनायक सावंत, रामचंद्र धुरी, प्रसाद येसाजी, अरुण आंबेरकर , साई पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय क्रीडा मंडळ अध्यक्ष संतोष कासले यांनी ट्रस्टच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. सर्व सामान्य जनतेच्या उपयोगी पडणारे उपक्रम अध्यक्ष शरद पेडणेकर आणि सहकारी राबवित आहेत. त्यांना यापुढेही मंडळाच्या माध्यमातून सहकार्य लाभेल असे ते पुढे म्हणाले. शिबीर यशस्वीतेसाठी तुळशीदास पेडणेकर, चंद्रकांत पेडणेकर, रुदाली पेडणेकर, पियुश पेडणेकर, सुहास पेडणेकर, निखिल पेडणेकर, दर्शित पेडणेकर, समिर पेडणेकर, सिध्दी पेडणेकर, शरद रा पेडणेकर, रमण पेडणेकर, मनिषा हडकर, शितल पेडणेकर, सायली पेडणेकर, साइप्रसाद पेडणेकर, भुपेश पेडणेकर, शोभा पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. आभार श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष शरद पेडणेकर यांनी मानले.