Home स्टोरी मसुरे- बांदिवडे गावाचा धवलक्रांती तुन विकास ! डॉ. विश्वास साठे

मसुरे- बांदिवडे गावाचा धवलक्रांती तुन विकास ! डॉ. विश्वास साठे

276

पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेच्या वतीने बोनस वाटप कार्यक्रम….

मसुरे प्रतिनिधी:

https://youtu.be/EfDkpyBFYhk?feature=shared

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे यापुढे अविरत कार्यरत राहणार आहे. या संस्थेची चालू वर्षी आर्थिक उलाढाल ७५ लाख रुपये इतकी आहे. चालू वर्षी दुधाचे संकलन वार्षिक एक लाख लिटर करण्याचा या संस्थेचा निर्धार आहे. अनेक शेतकरी या संस्थेमुळे आपल्या कुटुंबाचा संपूर्ण आर्थिक भार उचलत आहेत. वैद्यकीय व्यवसाय सांभाळून या संस्थेच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांसाठी मी नवीन नवीन उपक्रम राबवत आहे. माझ्या गावापासून शंभर किलोमीटर दूर येथे आल्यानंतर या जनतेने माझी ओळख नसताना सुद्धा मला सहकार्य केले. त्यामुळे या गावच्या, येथील जनतेच्या ऋणातून काही प्रमाणात उतराई होण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करत आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांनी दुध व्यवसायामध्ये उतरल्यास मसुरे आणि बांदिवडे गावातून दुधाचा महापूर आल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन दूध संस्थेचे सर्वेसर्वा डॉक्टर विश्वास साठे यांनी येथे केले.

येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे यांच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी बोनस रकमेचे वाटप नुकतेच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर बिळवस सरपंच सौ. मानसी पालव, बांदिवडे माजी सरपंच सतीश बांदिवडेकर, पांडुरंग ठाकूर, पंढरीनाथ मसुरकर, संस्था अध्यक्ष सौ अल्का साठे, उपाध्यक्ष सौ पूजा ठाकूर, सचिव तन्वी हिंदळेकर, तुळशीदास चव्हाण, बाबू आंगणे, दत्तप्रसाद पेडणेकर, संस्था सदस्य आबीदाबी चिस्ती, सीमा घाडीगावकर, सिद्धी मसूरकर, मानसी पवार, मयुरी पेडणेकर, प्रियंका बांदिवडेकरआदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मधून सरस्वती शिंगरे,शीतल परब, स्वप्नाली मोरे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. मनस्वी पेडणेकर, आरुषी चव्हाण, कु.शिंगरे या बालिकांनी चिठ्ठी काढली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी नारायण परब, अभी दुखंडे, अभी घाडीगावकर, गौरव गिरकर, तात्या बागवे, हेमंत बागवे, सुरज परब, संतोष राणे, विकास ठाकूर, उमेश बागवे, मारुती सावंत, महंमद खान, सोहेल फकीर, शशांक ठाकूर, स्वप्निल ठाकूर आद शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचलन बाबू आंगणे यांनी केले.