Home स्टोरी मसुरे दत्तमंदिर येथे २४ रोजी धार्मिक कार्यक्रम…!

मसुरे दत्तमंदिर येथे २४ रोजी धार्मिक कार्यक्रम…!

187

मसुरे प्रतिनिधी: मसुरे दत्तवाडी येथील दत्तमंदिरात  २४ फेब्रुवारी  रोजी सार्वजनिक श्री सत्यनारायणाच्या  पूजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजत श्रींची विधिवत पूजा अर्चा, सायंकाळी ५ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा तदनंतर तीर्थप्रसाद रात्रौ ९ वा. पर्यंत स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्रौ १० वा. अमृतनाथ दशावतार(म्हापण) यांचा ट्रिक्सिनयुक्त “सूर्यप्रकटला भुवरी अवतार दत्त गगनगिरी” हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे तरी या कार्यक्रमांचा लाभ भाविक रसिकांनी घ्यावा असे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.