Home स्टोरी मसुरे केंद्रशाळेच्या यशश्री ताम्हणकरने पटकावले सुवर्ण पदक.

मसुरे केंद्रशाळेच्या यशश्री ताम्हणकरने पटकावले सुवर्ण पदक.

105

मसुरे प्रतिनिधी: जि.प.पूर्ण प्राथ मसुरे नं.१ केंद्रशाळेची विद्यार्थीनी कु.यशश्री गुरुनाथ ताम्हणकर हीने मुंबई चर्चगेट येथे संपन्न झालेल्या डाँ.होमी भाभा बाल वैज्ञानिक २०२२/२३ स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागातून सुवर्ण पदक पटकावले. डाँ.यदुनाथ थत्ते (वैज्ञानिक BARC), डाँ.नंदिनी देशमुख (लेखिका) आणि ब्रुहन्मुंबई सायन्स टिचर असोशिएशनचे पदाधिकारी मान्यवरांच्या शुभहस्ते सुवर्ण पदक, गौरवपत्र आणि तीन हजाराचे बक्षिस देऊन कु.यशश्री हीस एस.एन.डी.टी.काँलेज चर्चगेट मुंबई येथे गौरवण्यात आले. या व्यतिरिक्त श्री.संजय सावंत (विलेपार्ले) यांजकडून विशेष अँवार्ड पाचशे रु.देऊन यशश्री हीस सन्मानीत करण्यात आले.

तीच्या या सुवर्ण भरारीचे कौतुक शा.व्य.स.अध्यक्ष श्री.सन्मेष मसुरेकर,उपाध्यक्ष सौ.शितल मसुरकर,शिक्षण प्रेमी सदस्य सौ.लक्ष्मी दत्तप्रसाद पेडणेकर,उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत,केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख,श्री.गुरुनाथ ताम्हणकर ,श्री.विनोद सातार्डेकर,श्री.गोपाळ गावडे ,सौ.रामेश्वरी मगर तसेच सर्व शा.व्य.समिती सदस्य व समस्त मसुरे ग्रामस्थ यांजकडून कौतुक करण्यात येत आहे. शालेय स्तरावर महत्त्वाची अशी विज्ञानावर आधारित डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा इयत्ता सहावी व नववी करिता लेखी, प्रात्यक्षिक ,प्रकल्प व मुलाखत अशा चार टप्प्यात मराठी व इंग्रजी माध्यमातून राज्यस्तरीय घेण्यात येते. यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत , कास्यपदक, शिष्यवृत्ती व सन्मानपत्र देऊन शास्त्रज्ञांच्या हस्ते गौरवण्यात येते व डॉ होमी भाभा रिसर्च सेंटर येथे दोन दिवस शिबिरात सहभाग घेता येतो.

मुलांनी नुसते परीक्षार्थी न बनता खऱ्या अर्थाने विद्यार्थी बनावे, त्यांची प्रयोगशीलता निरीक्षणशक्ती आकलन शक्ती चौकस बुद्धी वाढावी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांनी सृजनशील व्हावे व पर्यावरणाची नाळ जुळावी हे या स्पर्धेचे उद्दिष्टे आहेत. प्रकल्पासाठी पर्यावरण जतन आणि संवर्धन विषयासाठी प्राधान्य दिले जाते. संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी या स्पर्धेसाठी प्रविष्ट होतात. १०० गुणांची (MQS)लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी होते. त्यासाठी 90 मिनिटे वेळ असतो. विभाग, इयत्ता व माध्यमा नुसार ७.५% मेरीट नुसार मुले प्रात्यक्षिक practical साठी निवडली जातात. प्रात्यक्षिक परीक्षा ठाणे ,पुणे व मुंबई , वर्धा येथे होते. प्रात्यक्षिक परीक्षा ३० गुणांची असते यासाठी मुलांना विविध प्रयोग करावयाचे असतात. ही परीक्षा साधारण डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी असते. प्रात्यक्षिक परीक्षेतून दहा टक्के मुले प्रकल्प व मुलाखतीसाठी project & interview निवडले जातात. प्रकल्प व मुलाखत मुंबई येथे होते. त्यामुळे कु.यशश्री ताम्हणकर हीने मिळविलेले सुवर्ण पदक कौतुकास्पद आहे.