Home स्टोरी मसुरे कावावाडी येथे ९ डिसेंबरला हरिनाम सप्ताह….!

मसुरे कावावाडी येथे ९ डिसेंबरला हरिनाम सप्ताह….!

176

मसुरे प्रतिनिधी: 

मसुरे कावावाडी येथील श्री हनुमान मंदिर येथे दिनांक ९ डिसेंबर रोजी सात प्रहरांच्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी विधिवत पूजन झाल्यानंतर पंचक्रोशीतील विविध भजन मंडळी आपली सेवा बजावणार आहेत. रात्री कावावाडी मंडळाच्या वतीने चित्ररथ दिंडी मिरवणूक निघणार आहे. यानिमित्त देवालयास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हरिनाम सप्ताहाची सांगता रविवारी होणार आहे. भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.