Home स्टोरी मसुरेत इयत्ता दहावी मुलांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

मसुरेत इयत्ता दहावी मुलांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

104

मसुरे प्रतिनिधी (पेडणेकर ): विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कार्यशाळा या आपल्या दहावीच्या जीवनात मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. आज अर्चना कोदे मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मसुरे परिसरातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनोखा असा उपक्रम मोफत देऊन एक चांगला आदर्श शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केला आहे यापुढेही मसुरे एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अशा सर्व उपक्रमांना योग्य ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन मसुरे येथे बोलताना मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे उपाध्यक्ष उत्तम राणे यांनी दिले.

२ ते ४ मे या कालावधीत कै शरद गोवंडे स्मृती इयत्ता दहावी मार्गदर्शन कार्यशाळा आर पी बागवे हायस्कूल मसुरे येथे मोठ्या अपूर्व उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी उत्तम राणे आणि विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना उमेश कोदे मॅडम यांनी आपले सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था पदाधिकारी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे केले. मसुरे, माळगाव, बिळवस, महान, देऊळवाडा, चांदेर, बागायत या गावातील पंचक्रोशीतील सुमारे ४० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. जिल्ह्यातील नामांकित शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचा अभ्यास केव्हा व कसा करावा वेळेचे नियोजन कसे करावे परीक्षेत कोणत्या चुका टाळाव्यात तसेच प्रत्येक विषयाच्या अभ्यासातील कृप्त्या व महत्त्वाचे घटक याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

या वेळी मार्गदर्शक मराठी सौ नंदिनी साटलकर मॅडम कुडाळकर हायस्कूल मालवण च्या मुख्याध्यापिका, हिंदी श्री सुमंत दळवी सर कनेरी हायस्कूलचे मुख्याध्यापक व एस.एस् सी परीक्षा पेपर सेटर, इंग्रजी श्रीमती अनिता फर्नांडिस मॅडम जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण, गणित भूमिती सौ मेघना जोशी मॅडम माजी मुख्याध्यापिका जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, विज्ञान वन- टू श्री बर्डे सर विद्या मंदिर हायस्कूल कणकवली, इतिहास सौ ज्योती तोरसकर, वेळेचे नियोजन व शारीरिक मानसिक आरोग्य जपणुक सौ अर्चना कोदे मॅडम मुख्याध्यापिका आर पी बागवे हायस्कूल यांनी मार्गदर्शन केले. ४मे रोजी दुपारी ११ वा वर्गाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभली ती संस्थेचे मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष माननीय श्री उत्तम राणे, लोकल कमिटी अध्यक्ष श्री महेश बागवे,मुंबई कमिटीचे सह सेक्रेटरी संजय बागवे, मुंबई कमिटी संस्था सभासद श्री राजन परब, श्री शेखर बागवे,संस्थेचे हितचिंतक श्री फर्नांडिस ,भरतगड हायस्कूल नंबर दोन चे मुख्याध्यापक श्री एस आर कांबळे, डी पी पेडणेकर,भानुदास परब,अनिल मेस्त्री, चरणदास फुकट,रमेश पातडे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी व्यक्त केलेल्या मनोगतात कुमारी दीक्षा देवगडकर, कुमारी संस्कृती, कुमारी वैष्णवी, इत्यादींनी आपल्यासाठी आयोजित या बहुमूल्य कार्यक्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त केली व परीक्षेत यांचा उपयोग करुन उज्वल यश मिळवणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना लोकल कमिटीचे अध्यक्ष महेश बागवे म्हणाले मसुरे सहित परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय जीवनात पुढे आणण्यासाठी ही संस्था नेहमी कार्यरत आहे. भविष्यात सुद्धा अशा प्रकारचे विविध उपक्रम निर्माण करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाईल. अर्चना कोदे मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज मेहनत घेऊन दहावीच्या मुलांची मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वी केली याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातही तुम्हाला जे जे सहकार्य लागेल ते संस्था पातळीवरती आपण तुम्हाला देण्याचे जाहीर करतो. आजचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोदे यांनी केले.यावेळी मार्गदर्शक सर्व शिक्षक वृंदांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले.

फोटो: मसुरे येथे इयत्ता दहावी मार्गदर्शन वर्ग कार्यशाळेत सहभागी शिक्षक वर्ग,अर्चना कोदे आणि विद्यार्थी वर्ग छाया: शैलेश मसुरकर मसुरे.