Home स्टोरी मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे १९ ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रम!

मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे १९ ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रम!

73

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे येथे १९ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार निमित्त भाविकांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ८ वा श्री स्वामी समर्थ महाराजांची पुजा अर्चा, सकाळी ८:३०वा सामुहिक श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११वा. नैवेध आणि महाआरती, दुपारी १२. ३०‌ वा. प पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराजांचं आगमन आणि मागदर्शन, दुपारी १.३० वा. अन्नदान, महाप्रसाद, सायं. ६ ते ७ वा सुस्वर भजन, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ त्रिंबक बुवा कुमार रिया॑श चंद्र शेखर त्रिंबककर, संध्याकाळी ७:३० ला भजन श्री स्वामी नामा॑चे भक्ती गीते आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.