(बिहार) – येथे श्रीरामनवमीच्या दिवशी धर्मांध मुसलमानांकडून मिरवणुकीवर आक्रमण करून झालेली दंगल अद्याप शमलेली नाही. १ एप्रिलच्या रात्री येथे झालेल्या बाँबस्फोटात महंमद इरफान, महंमद राशिफ, महंमद शहजाद, महंमद आदिल, गुलाम हसन आणि महंमद अखलाक हे घायाळ झाले. येथील साहजमा मोहल्ल्यातील मशिदीजवळ हे सर्व जण बाँब बनवत होते. तेव्हा त्याचा स्फोट झाला. सर्व घायाळांना उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या सासाराममध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दंगल आणि बाँबस्फोट या घटनांची पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या येथे तणाव असल्याने पोलिसांनी सासाराम रेल्वे स्थानकावरही मोठा बंदोबस्त ठेवला आहे. या दंगलीमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सासाराम येथील त्यांचा दौरा रहित केला आहे.