सावंतवाडी वार्ताहर: मळगाव ब्रिज येथे चार चाकी आणि मॅजिक रिक्षामध्ये किरकोळ अपघात झाला. या अपघातानंतर चार चाकी गाडी मधील व्यक्तींनी रिक्षाचालकाला रिक्षातून ओढून बाहेर काढून आपल्या गाडीत नेऊन मारहाण केली. रिक्षा चालक स्थानिक असल्यामुळे त्याला मारहाण झालेली बातमी सगळीकडे पोहोचताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळी मोठी गर्दी झाली.
रिक्षा चालकाला मारहाण करून गाडीतून घेऊन जात होते. यावेळी रिक्षाचालकाला गिरीश शिरोडकर आणि रोहन मल्हार यांनी संबंधित मारहाण लोकांच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून मिळते. नंतर मळगाव चे उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते राजू परब आणि गुणाजी गावडे घटनास्थळी पोहोचले व संबंधित घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक फुलचंद मेगडे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. यावेळी रिक्षाचालकाला ज्या लोकांनी मारहाण केली त्या लोकांना आपल्या ताब्यात द्या. अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली. रिक्षाचालकाला मारण केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यामुळे मळगाव येथे ताण-तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर सर्वांना सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. या प्रकरणाबाबत पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. रिक्षाचालकाला मरहाण करणारे लोकप्रतिनिधीचे नातेवाईक असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.