सावंतवाडी प्रतिनिधी: मळगाव बाजारपेठ ते रेशन दुकान कडून नेमळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण काम शासनाच्या ०४ बजेट मधून मंजूर झाले आहे. आज २६ मार्च रोजी या खडीकरण व डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन माजी सभापती श्री राजेंद्र उर्फ राजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी उपस्थित मळगाव गावचे उपसरपंच श्री हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गावकर, भा.ज.पा शक्ती केंद्रप्रमुख निळकंठ उर्फ बाळा बुगडे, ग्रामस्थ नाना मांजरेकर, रंजन केणी, मनोज नाईक, विवेक नार्वेकर, उदय सावळ, व इतर ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.