Home स्टोरी मळगाव ग्रामपंचायतमध्ये प्रथम सरपंच पदाचे मानकरी कै. सुर्याजी सखाराम खानोलकर यांच्या तैल...

मळगाव ग्रामपंचायतमध्ये प्रथम सरपंच पदाचे मानकरी कै. सुर्याजी सखाराम खानोलकर यांच्या तैल तस्विरीचे अनावरण !

81

सावंतवाडी प्रतिनिधी: मळगाव ग्रामपंचायत ची स्थापना १९५७ साली झाली. मळगाव ग्रामपंचायतमध्ये १९५७ साली प्रथम सरपंच पदाचा मान मळगाव गावचे कै. सुर्याजी सखाराम खानोलकर यांना मिळाला. आज गुरुवार दि.२३ मार्च रोजी स्वामी प्रकट दिनी कै. सुर्याजी सखाराम खानोलकर यांच्या तैल तस्विरीचे अनावरण मळगावं ग्रामपंचायत मळगाव येथे करण्यात आले. कै. सुर्याजी सखाराम खानोलकर यांच्या तैल तस्विरीचे अनावरण करतांना कै. सुर्याजी सखाराम यांचे नातू श्री महेश खानोलकर यांनी उपस्थित होते. यावेळी मळगावं ग्रामपंचायतच्या सरपंच सौ स्नेहल जामदार, मळगावं उपसरपंच ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री हनुमंत पेडणेकर, मळगावं उपसरपंच ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री विजयानंद नाईक, माझी सभापती राजू परब, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, लाडू जाधव, निकिता राऊळ, निकिता बुगडे, ग्रामपंचायत माजी सदस्य गुरुनाथ गावकर, ग्रामस्थ काळोजी राऊळ, भालचंद्र सावंत, मनोहर राऊळ, सुभाष नाटेकर, चंद्रकांत जाधव, सुखदेव राऊळ, ग्रामपंचायत कर्मचारी आधी उपस्थित होते. तत्पूर्वी गुरूनाथ गावकर, महेश खानोलकर, चंद्रकांत जाधव, आनंद देवळी यांनी आपले विचार मांडले. मळगावंचे उपसरपंच श्री हनुमंत पेडणेकर यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली.