Home स्टोरी मर्डे ग्रामपंचायतच्या वतीने माजी सैनिक व गुणवंतांचा सन्मान!

मर्डे ग्रामपंचायतच्या वतीने माजी सैनिक व गुणवंतांचा सन्मान!

223

 

 

मसुरे प्रतिनिधी:

मालवण तालुक्याती लमर्डे ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील माजी सैनिक, गुणवंत विध्यार्थी, खेळाडू, शिष्यवृत्ती प्राप्त विध्यार्थी यांचा सरपंच संदीप हडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच राजेश गावकर, माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर, उद्योजक अल्ताफ सैयद, मंडळ अधिकारी सुहास चव्हाण, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, सुहास गावकर, ग्रा सदस्य जगू चव्हाण, सौ ठाकूर, पप्पू मुळीक, सचिन पाटकर, श्री सावंत, सौ आंगणे आदी उपस्थित होते.

यावेळी माजी सैनिक अशोक मोरे, धनंजय सावंत, रवींद्र दुखंडे यांचा तर वीर जवान कै बिभीषण चव्हाण, कै नारायण गावडे, कै. बाबुराव राणे, कै. मोहन दुखंडे यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. मुंबई टेनिस क्रिकेट संघातील खेळाडू आकाश संतोष मसुरकर, कराटेपट्टू वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर, शिष्यवृत्ती प्राप्त भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलच्या धृती भोगले, श्रिया परब, मानस धारगळकर तसेच कावा शाळेची विध्यार्थीनि नंदिनी आंबेरकर आणि दहावी व बारावी परीक्षेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. मसुरे केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील विविध नेत्यांच्या साकारलेल्या व्यक्तिरेखांचे कौतुक झाले. यावेळी केंद्रशाळा मुख्या. सौ शर्वरी सावंत, बागवे हाय मुख्या. सौ अर्चना कोदे, भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल मुख्याध्यापक किशोर देऊलकर , सुदर्शन मसुरकर, महेश खोत, विनोद मोरे, कमलेश ठाकूर, शैलेश मसुरकर, सचिन चव्हाण तसेच सर्व शाळांचे शिक्षक, ग्रामस्थ, विध्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार विनोद सातरडेकर यांनी मानले.