सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कवी संमेलनाची दिंडी काढून उत्साह सुरुवात झाली. या दिंडीत अनेक लहान मुलांनी सहभाग घेतला .
दिंडीमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दिंडीमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि शाळेतील मुलांनी वेगवेगळ्या घोषणा देऊन दिंडी मराठी भाषेबद्दल जागरूकता निर्माण केली.
मराठी साहित्य परिषद सावंतवाडीच्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषा आणि मराठी शाळांचे महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसाने पुढे आले पाहिजे. असे आवाहन केले