Home स्टोरी मराठा आरक्षणावर श्री दत्तात्रय पटवर्धन यांचा विशेष संवाद!

मराठा आरक्षणावर श्री दत्तात्रय पटवर्धन यांचा विशेष संवाद!

145

गेली काही वर्षे आरक्षण हा विषय फार चर्चेचा होऊन तो अगदी ऐरणीवर आल्यासारखा झाला आहे. (अगदी आताच्या जालना येथील आंदोलनासह)

मराठा आरक्षण विषयी प्रमुख दोन मुद्द्याकडे सर्वांच लक्ष वेधू इच्छितो!

मुद्दा क्रमांक १

१९५० साली भारत प्रजासत्ताक झाला

आणि १९५२ पासून देशात सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून आता पर्यंत ७१ वर्षे धरली आणि त्याला ५ ने भागले तरी महाराष्ट्र राज्याचे आता पर्यंत सरासरी १४ मुख्यमंत्री झाले. व त्यामध्ये मराठा समाजाचे ११ मुख्यमंत्री होते व ३ मुख्यमंत्री ब्राह्मण होते आणि त्या ३ मुख्यमंत्र्यांची कारकीर्द सुद्धा सर्वसाधारण १० वर्ष होती. आता पहा मराठा समाजाच्या ११ मुख्यमंत्र्यांनी सुमारे ६१ वर्ष राज्य केल तेव्हा हा प्रश्न सोडवण सोप होत.काहीही प्रयत्न न करता हा प्रश्न तात्काळ सुटला असता. पण तेव्हा हा मुद्दा कोणाच्या दृष्टिपथात ही आला नाही म्हणजे सरळ सरळ हे एक प्रकारचं राजकारण आहे आणि जशी एखादी कृत्रिम टंचाई किंवा कृत्रिम महागाई असते त्यातलाच हा एक प्रकार आहे हे निर्विविवाद जसा एखाद्या नाटकात किंवा चित्रपटात एखादा भीषण अपघात झालेला माणूस तशा पद्धतीचा मेकप करून दाखवला जातो ( त्याला खरा अपघात झालेलाच नसतो) त्या प्रमाणेच हे आहे.

 

मुद्दा क्रमांक २

 

आता विचार करण्यासारखा दुसरा भाग की जो पूर्ण राजकारण विरहित आहे तो पाहूया .” जात “ हा विषय मुळात निसर्गामध्येच आहे, फक्त कधी कधी आपण तेथे जात ह्या ऐवजी प्रकार हा शब्द वापरतो

उदा . लाकडाची जात

फणस , आंबा, सागवान, खैर वगैरे .

तांदुळाच्या जाती – कोलम बासमती वगेरे..

आंब्याच्या जाती – हापूस पायरी रायवळ वगैरे ..

आणि अशाच पद्धतीने कुत्र्याचा जाती वाघाच्या जाती, सर्पाच्या जाती असे अनेक प्रकार आहेत.

इथे कुठे आपण आरक्षणाचा वापर करतो का ?

उदा. १

एखादे मोठे घर बांधायचे असेल तेथे समजा

जर १०० % सागवान लाकूड वापरायचे असेल तर त्यामध्ये आरक्षण म्हणून २० % आंबा , १५ % , ३० % जांभूळ , ३० % सागवान अस आरक्षण करून वापरतो का ? तर नाही.जे लाकूड त्याच्या गुणधर्मानुसार जिथे आणि जेवढे वापरणे आवश्यक आहे तसे आपण ते वापरतो

.

उदा.२

एखाद्या श्रीमंत माणसाला आपल्या बंगल्यात ५ पोपट पाळायचे असतील तर इतर पक्ष्यावर अन्याय होईल म्हणून त्यांना आरक्षण देऊन तो एक कावळा, एक गिधाड, एक चिमणी, आणि दोन पोपट असे पाच पक्षी पाळेल का? ह्याचे उत्तर अर्थात नाही असेच आहे.

आता इतर व्यवहार पहा

आपण डॉ. कडे जातो तेथे जात बघून जात नाही. त्याच वैद्यकीय क्षेत्रातल कौशल्य आणि हुशारी बघून जातो आपण मेकॅनिक किंवा टेलर कडे जातो ते सुद्धा त्याची जात बघून जात नाही. तर त्याचे कौशल्य आणि गुण बघून जातो .थोडक्यात काय कोणत्याही गोष्टीचा वापर गुणवत्ता, गरज, आणि आर्थिक क्षमता ह्या निकषानुसार केला जातो.

आता हे आरक्षण जर लष्करी किंवा निम लष्करी क्षेत्रात आणि वैद्यकीय क्षेत्रात सक्तीचं केलं तर एकूण देशाची व आरोग्याची दुर्दशा व्हायला वेळ लागणार नाही.त्यामुळे हे जातीनुसार न ठेवता आर्थिक दुर्बलता आणि गुणवत्ता हा निकष लावून दिले पाहिजे.जे गुणी आहेत हुशार आहेत पण आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्या साठी अगदी ७० टक्के आरक्षण ठेवले तरी चालेल.कारण त्यातून महत्त्वाच्या २,३ गोष्टी साध्य होतील सबंधितांची गरिबी नष्ट होईल.गरीब परिस्थिती अनुभवल्यामुळे ते लोक प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे आपले कर्तव्य पार पाडतील.आणि अर्थातच त्यामुळे देशाला त्याच्या कलागुणांचा पुरेपूर फायदा होईल. आणि पर्यायाने देशाची ही प्रगती व उन्नती होईल.

आपण कौटुंबिक सुद्धा जीवन जगताना सुद्धा वर उल्लेख केल्या प्रमाणे जाती ऐवजी गुणाचा विचार करतो मग जेथे अखंड राष्ट्राचा विषय आहे तेथे तर केवळ गुणांचाच विचार झाला पाहिजे .

वरील दोन मुद्द्या मधे सांगितलेले व व्यक्त केलेले जे सुस्पष्ट विचार आहेत त्याच्यावर जर ईश्वराच्या साक्षीने चिंतन , मनन केले तर सर्वजण आरक्षणाचा विचार आपणहून च स्वेच्छेने स्वयं स्फूर्तीने सोडून देतील आणि एक राष्ट्र प्रेमी या नात्याने राष्ट्रकार्यास व राष्ट्रोन्नतीस हातभार लावतील, अशी मला आशा आणि खात्री वाटते..

 

साभार: श्री दत्तात्रय पटवर्धन. वय – ७० वर्ष         कोलगाव, सावंतवाडी मो. ९३०९९४९५०८.