Home राजकारण मनसे अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कराळे सभागृह, तरळा येथे...

मनसे अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कराळे सभागृह, तरळा येथे बैठक संपन्न

117

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र नवनिर्माण सेना, देवगड – कणकवली – वैभववाडी विधानसभामहाराष्ट्र नवनिर्माण सेना, अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते श्री शिरीष सावंत साहेब व मनसे कामगार सेना, सरचिटणीस श्री गजानन राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक कराळे सभागृह ,तरळा येथे संपन्न झाली. या बैठकीला देवगड तालुक्यातील असंख्य महिला व पुरूष महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. तसेच देवगड तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करून गावागावात मनसे पक्ष वाढेल यावर वरीष्ठ पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील ई स्टोर कंपनी संदर्भात उग्र आंदोलन करण्यात येणार आहे. ज्यांची ई स्टोर कंपनीकडून फसवणूक झाली आहे. त्यांनी संतोष मयेकर ,संपर्क क्रमांक 8169657795 व बबलू परब ,संपर्क क्रमांक 9421263763 या क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवायची आहे. ई स्टोर कंपनी संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सिंधुदुर्ग, जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या लोकांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आक्रमक भुमिका घेऊन आंदोलन करणार आहे. असे मनसे नेते श्री शिरीष सावंत साहेब यांनी महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करताना जाहीर केले आहे.