Home स्टोरी मनसेची स्वर्गीय प्रमोदजी महाजन मैदान रत्नागिरी येथे होणार जाहीर सभा

मनसेची स्वर्गीय प्रमोदजी महाजन मैदान रत्नागिरी येथे होणार जाहीर सभा

161

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या स्वर्गीय प्रमोदजी महाजन मैदान रत्नागिरी येथील जाहीर सभेला देवगड तालुक्यातून हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या संदर्भातील नियोजनाच्या संदर्भातील महत्वाची बैठक जामसंडे येथे आयोजित करण्यात आली. यावेळी देवगड तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना पक्षाच्या सरचिटणीस मा. नगरसेवका स्नेहल जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रत्नागिरी येथील जाहीर सभेला देवगडवासियांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन त्यानी केले. सदर बैठकीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या १० बसेस तसेच ४० चारचाकी वाहनांचे प्रयोजन करण्यात आले यावेळी चित्रपट सेनेचे चिटणीस संतोष भाऊ शिंगाडे देवगड संपर्क अध्यक्ष विमोल मयेकर, सह संपर्क अध्यक्ष संतोष मयेकर, मा. तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, उप तालुकाध्यक्ष महेश नलावडे, शहर अध्यक्ष सचिन राणे, विभाग अध्यक्ष परेश आडकर, कातवन विभाग अध्यक्ष नंदकुमार हडकर, तोरसोळे शाखाध्यक्ष राजन पवार, कट्टा शाखाध्यक्ष विराज जावकर, मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, उपविभागीय सचिव निलोफर सय्यद, मनसे लॉटरी सेनेचे तालुकाध्यक्ष अमित घाडी, महाराष्ट्र सैनिक बबलू परब, मंगेश कातवनकर, अनिकेत धुरी, अभिजित गावकर, आशिष खरात, अभय कातवनकर आधी उपस्थित होते