Home स्टोरी मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकता कल्चरल अकादमीचा ‘सांस्कृतिक कार्यकर्ता’ पुरस्कार जाहीर….!

मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकता कल्चरल अकादमीचा ‘सांस्कृतिक कार्यकर्ता’ पुरस्कार जाहीर….!

117

ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या हस्ते १३ जानेवारी रोजी गिरगाव साहित्य संघात मातोंडकर यांचा गौरव.

ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांची प्रमुख उपस्थिती

 

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य- सांस्कृतिक – सामाजिक क्षेत्रात गेली 40 वर्ष महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कवी मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकदा कल्चरल अकामीचा महात्मा ज्योतिबा फुले स्मृती सांस्कृतिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. 13 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव साहित्य संघ येथे ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या एकता कल्चरल महोत्सवात श्री मातोंडकर यांना सदर पुरस्काराने ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.यासाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांनी काम पाहिले.

एकता कल्चरल मुंबई संस्था गेली पस्तीस वर्षे संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य कला संगीत नृत्य अभिनय या क्षेत्रातील गुणवंत कलाकारांना गौरवित असते. यात निष्ठेने सांस्कृतिक काम करणाऱ्या परंतु प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊ त्यांना दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार देऊ सन्मानित करते. यावर्षीच्या या पुरस्कारासाठी गेली 40 वर्ष तळकोकणात सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मधुकर मातोंडकर यांची एक मताने निवड करण्यात आली.

मधुकर मातोंडकर समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षात समाज साहित्य विचार संमेलने यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. तर सुमारे बावीस वर्षे विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सिंधुदुर्गचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.संस्कृती प्रतिष्ठान, इचलकरंजीचे सल्लागार म्हणूनही ते काम पाहत आहेत.कोकण रेल्वे -वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक पदावर ते कार्यरत असून वाचन संस्कृतीत वाढ व्हावी यासाठीही ते सातत्याने कार्यरत असतात. अत्यंत सुस्वाभावी आणि सेवाभावी असणाऱ्या मातोंडकर यांना सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.