Home स्टोरी मदन सावंत यांचा अभिनेता श्री शरदजी पोंक्षे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व...

मदन सावंत यांचा अभिनेता श्री शरदजी पोंक्षे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान

152

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: केसरी गावचे सुपुत्र श्री मदन तानाजी सावंत गेली २५ वर्षे गोरक्षा, लव्ह जिहाद रोखणे तसेच विविध हिंदू धर्मावरील आघात रोखण्याच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल कराड येथे हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने अभिनेता श्री शरदजी पोंक्षे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले पारंपरिक शिवजयंती निमित्त सावरकरांचे हिंदूत्व आणि हिंदुराष्ट्र स्थापना या विषयावर श्री शरदजी पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित केले होते यावेळी भाजपचे संघटक श्री मकरंद देशपांडे, हिंदू एकता आंदोलन प्रांताध्यक्ष श्री विनायक पावसकर, संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत जिरंगे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव व हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते या कार्यक्रमाला ५ हजारहून अधिक सावरकरप्रेमी उपस्थित होते.

(फोटो : सन्मान स्वीकारताना उजवीकडून श्री मदन सावंत)