Home स्टोरी मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन रद्द.

मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन रद्द.

193

३ जून वार्ता: शुक्रवारी सायंकाळी दुर्घटना ओरिसा मधील भीषण रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे आज दिनांक ३ जून रोजी होणारे उद्घाटन रद्द करण्यात आले आहे. गोव्यात मडगाव स्टेशनवर मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन आज होणार होते.