Home स्टोरी मंत्र्याकडून स्वत:च्याच खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप, रवींद्र चव्हाणांच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

मंत्र्याकडून स्वत:च्याच खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप, रवींद्र चव्हाणांच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

114

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सार्वजनिक बांधकाम विभागात पैशांच्या मोबदल्यात बदल्या केल्या जात असल्याचा आरोप खुद्द सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.तर एका मंत्र्यानेच स्वतःच्या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्यानं खळबळ माजली आहे. पैसे देऊन होणाऱ्या बदल्या रोखता येत नसल्याचं सांगत रवीद्र चव्हाण यांनी हतबलता व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचाही आरोप त्यांनी केलाय. सार्वजनिक बांधकाम खात्यात कोण हस्तक्षेप करतो असा सवाल उपस्थित केला जातोय.सार्वजनिक बांधकाम विभागातील बदल्या करताना अधिकारी जुमानत नाही का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात होणाऱ्या बदल्यांमध्ये पैसे घेतले जातात, याला आळा घालण्यासाठी मी प्रयत्न करतोय, मात्र माझ्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सार्वजनिक बांधकाम विभागात बदल्यात पारदर्शकता असावी, असं म्हणत रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्याच खात्याबाबत खंत व्यक्त केली. ‘मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होतो. या विभागात बदल्यांमध्ये ज्या पद्धतीने पैसे घेतले जातात, हे यानंतरच्या काळात करू नका. अधिकाऱ्यांनीच यामध्ये स्वत: मी बदलीसाठी पैसे देणार नाही, ही भूमिका ठेवली तर विभाग चांगल्याप्रकारे चालेल. वारंवार या गोष्टी होत राहिल्या, तर मनाला वेदना होतात. नेहमी सांगून सुद्धा अधिकारी स्वत:च्या स्वार्थासाठी हे करतात. त्यांची स्पर्धा काही विशिष्ठ पदांसाठी आहे. त्या स्पर्धेसाठी ही सगळी मंडळी हे सगळं करत राहतात, त्यामुळे त्यांनी हे करू नये,’ असं रवींद्र चव्हाण म्हणाले.