Home राजकारण मंत्रीमंडळाच्‍या खातेवाटपाचा तिढा कायम, भाजपचे वरिष्‍ठ नेते हस्‍तक्षेप करणार!

मंत्रीमंडळाच्‍या खातेवाटपाचा तिढा कायम, भाजपचे वरिष्‍ठ नेते हस्‍तक्षेप करणार!

187

१३ जुलै वार्ता: राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या ९ जणांना मंत्रीपदांची शपथ देऊन १० दिवस झाले, तरी अद्याप यांपैकी कुणालाही खातेवाटप झालेले नाही. राष्‍ट्रवादी काँग्रेससाठी देण्‍यात आलेली खाती मान्‍य नसल्‍यामुळेच खातेवाटप लांबणीवर गेल्‍याचे आता स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे खातेवाटपाच्‍या निर्णयात भाजपच्‍या वरिष्‍ठ पातळीवरून हस्‍तक्षेप होण्‍याची शक्‍यता आहे. १२ जुलै या दिवशी उपमुख्‍यमंत्री अजित पवार हे मुंबईहून देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्‍यासाठी गेले. त्‍यामुळे खातेवाटपाचा निर्णय लवकरच सुटण्‍याची शक्‍यता आहे. अजित पवार यांसह मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही देहली येथे जाण्‍याची शक्‍यता आहे.उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागील सलग ३ दिवस उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍यासमवेत बैठक झाली. १२ जुलै या दिवशी सकाळीही फडणवीस यांची अजित पवार यांची बैठक झाली; मात्र अद्याप खातेवाटपाचा निर्णय झालेला नाही.

राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्‍यासाठी मंत्रीमंडळाच्‍या खातेवाटपाचा तिढा कायम, भाजपचे वरिष्‍ठ नेते हस्‍तक्षेप करणार!अर्थमंत्रीपदाची मागणी करण्‍यात येत आहे; मात्र भाजप आणि शिवसेना अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्‍यास अनुकूल नसल्‍याचे पुढे आले आहे.राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी १३ जुलैच्‍या सायंकाळपर्यंत खातेवाटप होईल, असे सांगितले. १७ जुलै या दिवशी विधीमंडळाचे अधिवेशन चालू होणार आहे. अधिवेशन चालू होण्‍यापूर्वी खातेवाटप झाले तरच संबंधित मंत्र्यांना अधिकार्‍यांना त्‍याविषयीची माहिती देता येईल. त्‍यामुळे येत्‍या १-२ दिवसांत खातेवाटपावर निर्णय घ्‍यावाच