Home स्टोरी भोमवाडी येथील श्रीमती पार्वती वेंगुर्लेकर यांचे निधन

भोमवाडी येथील श्रीमती पार्वती वेंगुर्लेकर यांचे निधन

106

सिंधुदुर्ग: आजगाव-भोमवाडी येथील श्रीमती पार्वती शंकर वेंगुर्लेकर यांचे बुधवार दि. १२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. शिरोडा बाजारपेठेतील ‘नॅशनल मेन्स वेअर’चे मालक श्री. गजानन वेंगुर्लेकर, वाहन व्यावसायिक श्री. गुरुनाथ वेंगुर्लेकर यांच्या त्या मातोश्री व मळेवाड नं. १ प्रशालेतील शिक्षिका सौ. उषा वेंगुर्लेकर यांच्या त्या सासू होत. श्रीमती पार्वती वेंगुर्लेकर या समाजाच्या कष्टकरी पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्ती होत्या. शेती आणि बारीकसारीक जोडधंदे करून त्यांनी उत्तम प्रपंच चालविला. झावळ्यांची झापे, गावठी कोंबडीपालन, गोपालन करून त्यांनी प्रपंचास आर्थिक जोड मिळवून दिली. वरील व्यवसाय त्यांनी लाज न बाळगता प्रामाणिकपणे केला. कोणतीही कुरकुर न करता चार मुलांचा चरितार्थ त्यांनी पतीला साथ देत उत्तमपणे केला. वयाच्या ८२ वर्षापर्यंत त्या निरोगी आणि स्वावलंबी जीवन जगल्या. जीवनाच्या अखेरपर्यंत शेजाऱ्यापाजाऱ्याशी त्यांनी स्नेहसंबंध जोडून ठेवले. कोणताही मान-अपमान न बाळगता परस्परांच्या मदतीला धाऊन जाणारी, लोभ.माया,आदर जोपासणाऱ्या समाजाच्या एका विशिष्ट पिढीतील ही व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली.