Home स्टोरी भोजपूरी सिनेमा अभिनेत्री आकांक्षा दुबेने केली आत्महत्या!

भोजपूरी सिनेमा अभिनेत्री आकांक्षा दुबेने केली आत्महत्या!

78

भोजपूरी सिनेमा अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने बनरासमधील एका हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सारनाथ ठाण्याच्या क्षेत्रातील सोमेंद्र हॉटेलमध्ये अभिनेत्री आंकाक्षा हिनं गळफास लावून घेतला आहे. आकांक्षा भदोही जनपदमधील चौरी ठाणा परिसरातील परसीपूरची रहिवाशी होती. भोजपूरी फिल्म इंडस्ट्रीतील आकांक्षा हि एक लोकप्रिय अभिनेत्री होती.अभिनेत्री आकांक्षाने ‘वीरों के वीर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की 2’ यासारख्या सिनेमात काम केलं आहे. तिनं आत्महत्या का केली? यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.