Home स्टोरी भाल गावात खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून बसविलेल्या पथदिव्यांचे शहर प्रमुख...

भाल गावात खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून बसविलेल्या पथदिव्यांचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण!

79

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – श्री मलंग पट्टयातील भाल गावात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून बसविण्यात आलेल्या पथदिव्यांचे लोकार्पण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले, या पथदिव्यांमुळे गेली अनेक वर्षा पासून भाल गांवात असलेले रात्रीच्या अंधाराचे राम्राज्य नष्ट होऊन गावातील रस्ते पथदिव्यांच्या उजेडाने न्हावून निघाले असल्याने ग्रामस्त मंडळींनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे आभार मानले आहेत. गेली अनेक वर्षे श्रीमलंग पट्टयात नागरी सुविधांचा अभाव आहे त्यातच पथदिवे नसल्याने रात्रीच्या अंधाराचा स्थानिक रहिवाश्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता, या गंभीर समस्येचा विचार करून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेकडे सातत्याने पाठपूरावा करून ५ लाखांच्या खासदार निधीतून भाल गावातील रस्त्यांवर पथदिवे बसवून घेतले आहेत. या पथदिव्यांचे लोकार्पण महेश गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. या समयी महेश गायकवाड यांनी सांगितले की श्रीमलंग पट्टयातील अनेक गावखेड्यात २७ गावांचा पश्न न्यायप्रविष्ठ असल्याने महापालिकेच्या सुविधा पोहचल्या नाहीत त्या सुविधा टप्प्या टप्प्याने उपलब्द करून देण्याचा प्रयत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे माध्यमातून येणाऱ्या काळात केला जाणार आहे, आपल्या मतदार संघाकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सातत्याने लक्ष आहे, याचाच एक भाग म्हणून त्यांच्या खासदार निधीतून पथदिवे बसविण्यात आले आहेत .या समयी शाखा प्रमुख गणेश म्हात्रे तसेच शंकर महाराज म्हात्रे, गजानन म्हात्रे, जिवन मढवी, पप्पू टावरे, दाजी चिकनकर, गिरिष चिकणकर, जीत मढवी, हरिश्चंद्र सुरखाडे, गजानन म्हात्रे, प्रशांत बोटे आदी मान्यवर उपस्थित होते .