B. Sc. (फिजिक्स, मॅथेमॅटिक्स) कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पदवीधर (कमीत कमी ६०% टक्के मार्क) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतीय हवामान खात्यात अधिकारी नियुक्ती पदासाठी एकूण ९९० जागांसाठी भरती होणार आहे. मराठी मुलांच्या निदर्शनास ही जाहिरात आणावी. फक्त लेखी परीक्षा असते. पगार ही उत्तम आहे. All india posting असते. पण साधारण ३ वर्षांनंतर आपले चॉईस स्टेशन मिळते. दक्षिण व उत्तर भारतातील मुले ही परीक्षा आवर्जुन देतात व त्यांचीच भरती मोठ्या संख्येने होते. तरी महाराष्ट्रातील मराठी विध्यार्थ्यांनी अशा क्षेत्रात कार्यरत व्हावे. मराठी मुलांनी भारतीय हवामान खात्यात अधिकारी नियुक्ती पदासाठी अर्ज भरावेत आणि परीक्षा उत्तीर्ण व्हावे असे आव्हाहन काही महाराष्ट्र राज्यातील संघटनांनी केले आहे. खाली दिलेल्या जाहिरात लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp