Home स्टोरी भारताची चंद्रावर स्वारी यशस्वी!

भारताची चंद्रावर स्वारी यशस्वी!

153

२३ ऑगस्ट वार्ता:

भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर यशस्वी झाली आहे. चांद्रयान – ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताच्या या कामगिरीचं जगानं कौतुक केलं आहे.  सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. 5.44 वाजता : इस्रोच्या मिशन कन्ट्रोलनं लँडर मॉड्यूलला पॉवर डिसेंटची कमांड दिली. यानंतर लँडर मॉड्यूलनं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू केली. पुढे चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. यातील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेजचा होता.