Home स्टोरी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबडेकर जयंतीला रंगणार कसवणला जिल्हास्तरीय काव्यमैफल

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबडेकर जयंतीला रंगणार कसवणला जिल्हास्तरीय काव्यमैफल

45

मसुरे प्रतिनिधी: नक्षत्राचं देणं काव्यमंच महाराष्ट्र,विभाग सिंधुदुर्ग आयोजित काव्यमैफलीचे नि:शुल्क आयोजन करण्यात आले आहे.भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनी कसवण बौद्धवाडी ता.कणकवली येथे दि.१४ एप्रिल २०२३ रोजी जिल्हास्तरीय काव्यमैफल आयोजित केलेली आहे.तरी एक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कविता व दुसरी आपल्या आवडीची कोणतीही मराठी ,अगर मालवणी कविता सादर करायची आहे. तरी सहभाग घेणाऱ्या कवी/कवयित्रिंनी आपले नाव कवी श्री.उदय सर्पे, 9403228364, कवी श्री.राजेंद्र गोसावी 9405778726, कवी सुरेश पवार 9422633118, कवी नरेंद्रकुमार चव्हाण 9403851877 यांच्याकडे आपल्या मोबाईल नंबर सह द्यायची आहेत.सहभागी कवींना सन्मानपत्र देण्यात येणार आहे.याची नोंद घ्यावी. काव्यवाचन मैफल सकाळी १०•३० वा.कार्यक्रम स्थळ-समाजमंदिर कसवण (ग्रामपंचायत कसवण तळवडे कार्यालय जवळ)ता.कणकवली जि.सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार आहे. अशी माहिती नक्षञाचं देणं काव्यमंच सिंधुदुर्ग अध्यक्ष कविवर्य उदय सर्पे यांनी कळविली आहे.