Home स्टोरी भाताला हेक्टरी २० हजार रु बोनस जाहीर..!आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश.

भाताला हेक्टरी २० हजार रु बोनस जाहीर..!आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश.

168

सिंधुदुर्ग: राज्य शासनाकडून केल्या जाणाऱ्या भात खरेदीवर बोनस जाहीर करण्याच्या आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश आले आहे. भात खरेदीवर हेक्टरी २० हजार रु बोनस रक्कम सरकारने जाहीर केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी भात शेती करतात. शासनाकडून भात खरेदीवर क्विंटल मागे २१६५ रु दर दिला जात आहे.मात्र गेल्या वर्षी शेतकऱ्यांना भातखरेदीवर अतिरिक्त बोनस देण्यात आलेला नाही. आता भात खरेदी सुरू झाली असून लवकरात लवकर बोनसची रक्कम जाहीर करावी अशी मागणी मागील आठवड्यात आमदार वैभव नाईक यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्याचबरोबर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन देखील केले होते. याची दखल सरकारला घ्यावी लागली असून भात खरेदीवर हेक्टरी २० हजार रु. बोनस रक्कम जाहीर करण्यात आली आहे.