Home राजकारण भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा  पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक दोडामार्ग...

भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा  पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक दोडामार्ग येथे संपन्न.

119

दोडामार्ग प्रतिनिधी: भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठकीच्या आयोजन दोडामार्ग तालुक्यातील झरे धनगरवाडी येथे करण्यात आले होते यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी, जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, दोडामार्ग तालुका मंडळाध्यक्ष सखाराम जंगले, संतोष झोरे, सौ काळे व इतर मान्यवर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी व जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी उपस्थियांच्या समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आल्या मागील पुढील सर्व गोष्टींचा विचार करून एकजुटीने आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत असा शब्द उपस्थित त्यांनी देत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू असे आश्वासित केले. जनतेचे प्रश्न सुटावे आणि त्यासाठी लागेल ते आपल्या माध्यमातून करण्यात यावे अशी सूचना उपस्थित आतून संतोष झोरे यांनी केली त्यांच्या सूचनेचा मान ठेवत उपस्थित मान्यवरांनी त्यांना शब्द दिला आहे. आपल्या समस्या जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या वतीने करणार असे आश्वासित केले उपस्थित त्यांनी देखील या ठिकाणी आपले म्हणणे मांडले. सभेची प्रस्तावना सूत्रसंचालन तालुका मंडल अध्यक्ष सखाराम जंगले यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष झोरे यांनी मानले.