उत्तर प्रदेशम कानपूरमध्ये भाजपाचे बडे नेते आणि त्यांच्या पत्नीनं विषारी पदार्थाचं सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असल्याची काल घडली. भाजपाचे बडे नेते गुरविंदर सिंह छाबडा आणि त्यांच्या पत्नीने विषारी पदार्थाचं सेवन केलं. त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी रुग्णालयात धाव घेऊन गुरविंदर सिंह छाबडा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. गुरविंदर सिंह छाबडा हे भाजपाचे माजी दर्जाप्राप्त राज्यमंत्री आहेत. त्याबरोबरच ते यूपी पंजाब अकादमीचे उपाध्यक्षही आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं विषारी पदार्थाचं सेवन केल्याची बातमी पसरताच भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांना याची माहिती मिळताच तेही रुग्णालयात पोहोचले. उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी सांगितले की, छाबडा आणि त्यांच्या पत्नीने विषारी पदार्थाचं सेवन केल्याची माहिती मला मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेण्यासाठी मी रुग्णालयात आलो. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. यासंदर्भात एसीपी बृजनारायण यांनी सांगितले की, भाजपा नेते आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांना रिजन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे दोघांवरही उपचार सुरू आहेत. आता दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांनी विषारी पदार्थाचं सेवन का केलं, यामागचं कारण ते शुद्धीवर आल्यावरच कळेल.
Home स्टोरी भाजपाचे बडे नेते गुरविंदर सिंह छाबडा आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती धोक्याबाहेर! एसीपी...