भाजपचे जेष्ठ खासदार गिरीष बापट यांचे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेश कार्यालयात उपचार चालु होते. केले काही दिवस ते प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांच्यावर घरीच उपचार चालू होता. पण काल त्यांची तब्येत खुपच खालावल्याने त्यांनी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान आज पावणे एक वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी ते वय 75 वर्षांचे होते.
गिरीष बापटांनी 1983 ला पुणे महापालिकेतून नगरसेवक म्हणून आपल्या राजकिय करियरची सुरवात केली होती. पुणे महापालिकेत ते सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी कसबा पेठ मतदार संघातून 1993 ची विधानसभा पोटनिवडणुक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव स्विकाराव लागला असला तरी त्यानंतर त्यांनी सलग पाच वेळा कसबा पेठेचे प्रतिनिधीत्व केले. राज्याच्या मंत्रिमंडळातदेखिल त्यांनी अनेक महत्वाची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्रातील अनेक खात्यांचे मंत्रीपद त्यांनी भुषवले. पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आपली विशेष ओळख बनवली. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते.
गिरिश बापट आजारपणातदेखिल पक्षाच्या कामात कार्यरत होते. कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रकृती खालावली तरी ते प्रचार सभेत दिसले होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्य़ा सामाजिक तसेच राजकिय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.