Home स्टोरी भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे गुणवंतांचा सत्कार!

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे गुणवंतांचा सत्कार!

194

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): माता काशीबाई मेमोरियल चॅरिटेबल स्ट्रस्ट संचालित भरतगड इंग्लिश मिडियम स्कूल मसुरे या प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले .यावेळी संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांनी मार्गदर्शन करताना विध्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी प्रशालेतील मागील वर्षात राज्य,जिल्हा तसेच तालुका पातळीवर क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुद्धा गौरविण्यात आले .कमिटी सदस्य बाबाजी भोगले, डॉ.वीणा मेहंदळे, जगदीश चव्हाण,पंढरीनाथ मसुरकर,तातू भोगले, तसेच पालक भिकाजी आंगणे, दिनेश बागवे, महेश मुळीक, विनोद चेंदवनकर हे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी चेअरमन संग्राम प्रभुगावकर तसेच मुख्याध्यापक किशोर देऊलकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेच्या शिक्षिका पार्वती कोदे, गौतमी प्रभुगावकर, संजना प्रभुगावकर,सायली म्हाडगुत, संतोषी मांजरेकर,स्टेला लोबो, स्वरांजली ठाकूर,रसिका मेस्त्री, तनुश्री नाबर, सविता मेस्त्री, रेश्मा बोरकर तसेच कर्मचारी वसंत प्रभुगावकर, समीर सावंत, संतोष परब, करुणा चव्हाण, प्रिया पाटकर यासर्वांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोषी मांजरेकर यांनी केले तर आभार सायली म्हाडगुत यांनी मानले.