Home क्राईम भडगांवत पत्नीचा खून करून पती पसार !

भडगांवत पत्नीचा खून करून पती पसार !

112

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील भडगाव येथे भाड्याने वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय दाम्पत्यात वाद होऊन पतीने पत्नीचा खून केल्याची घटना आज सकाळी घडली. दरम्यान पत्नीचा खून करून पती पळाला असल्याची माहिती समोर येत आहे. हा खून गळा आवळून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. कुडाळ पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, पंचनामा केला तसेच संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भडगाव येथे परराज्यातून कामानिमित्त एक दांपत्य आले होते. या पती पत्नीत काही कारणास्तव वाद झाला. त्यानंतर पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेतील संशयित आरोपी खून करून पळाला आहे. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी पोलिस मागावर असून ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. यासंदर्भात कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, आवळेगाव दूरक्षेत्राचे मंगेश जाधव इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनीही पोलिसांकडून ठाण्यात भेट देऊन माहीती घेतली. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.