मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाची (S.T.)बस सेवा बोरिवली- मांडवा च्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सदर फेरी पूर्ववत करण्याची मागणी अलिबाग येथीलसुयोग सुरेश नाईक, राजेंद्र दामोदर घरत यांनी केली आहे. पुर्वी सदर बस जाण्या येण्याचा प्रवास एस व्ही रोड मार्गे सुरू होता. आता फ़क्त सकाळी बोरिवली – मांडवा एस व्ही रोड मार्गे सुरू असुन परतीचा प्रवास वेस्टर्न हायवे वरुन सुरू आहे. या मार्गावर नेहमीच ट्रांफिक जाम असते, त्यामुळे नेहमी एक दिड तास उशिरच होतो. या एस.टी.चा लाभ घेणारे सर्वसमान्य प्रवाशी एस.व्ही.रोडलगतच राहतात. तसेच या मार्गे प्रवाशी संख्याही मोठी आहे. सायंकाळी एस.व्ही.रोड वर वाहतुक सुरळीत असते.
असे असताना हायवे वरुन एस.टि. का नेली जाते? हायवे ला उतरल्याने सर्व सामान घेवुन रिक्षा अथवा टैक्सी शिवाय पर्याय नसतो. व हा नाहक खर्च नेहमीच सामान्य प्रवाश्याना परवडणारा नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्र परिवहन मंडळाने वरील अडचण लक्षात घेउन कृपया सदर एस.टी. बस सेवा दोन्ही बाजुकडील प्रवासा करीता नियमीतपणे एस.व्ही.रोड.मार्गे.सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे.