Home स्टोरी बॉलिवूड विश्व, आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी ही मुंबईची ओळख आहे! बागेश्वर धामच्या धीरेंद्र...

बॉलिवूड विश्व, आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी ही मुंबईची ओळख आहे! बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचे वक्तव्य.

62

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी मुंबईचं नाव बदलण्याचं वक्तव्य केलं आहे. मुंबई शहराचं यापूर्वीच नाव हे बॉम्बे होतं. मात्र, बॉम्बे नाव बदलून ते मुंबई करण्यात आलंय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर जगाची नजर असते. त्यामुळे, मुंबई जगप्रसिद्ध शहर असून कोट्यवधी लोकांची भूक भागवण्याचं काम मुंबई करते. मात्र, या मुंबईला माया नगरी असंही संबोधलं जातं. बॉलिवूड विश्व, आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी ही मुंबईची ओळख आहे. त्यामुळे, मुंबईला माया नगरी म्हटलं जातं. मात्र, मुंबईचं हेच माया नगरी नाव बदलायचंय, मुंबईला माया नगरी म्हणू नका, असे आवाहन धीरेंद्र शास्त्री यांनी केलंय. धीरेंद्र शास्त्री हे २ दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यांच्या मुंबई दौऱ्यालाही अनेकांचा विरोध होता. तर, अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही त्यांना आव्हान दिलं होतं. त्यावरही, धीरेंद्र शास्त्री यांनी भाष्य केलंय. काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री? मुंबईतील येड्यांनो तुम्ही म्हणता ही माया नगरी आहे, पण आता मी म्हणतो माया नगरीला माधव नगरी बनवायचं आहे. तुम्ही माया खूप जमा केली, आता बागेश्वर धामसोबत माधवलाही सोबत घेऊया. मी आव्हांनाना घाबरत नाही. मी जर महाराष्ट्रात आलो नसतो तर विरोधकांना जिंकल्याचा आनंद झाला असता. असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी नाव न घेता आपण कुणालाही घाबरत नाही असं विरोधकांना उद्देशून म्हटलं आहे.