Home स्टोरी बुधवारी कल्याण पूर्वेत भव्य हिंदू नव वर्ष स्वागत यात्रा !

बुधवारी कल्याण पूर्वेत भव्य हिंदू नव वर्ष स्वागत यात्रा !

52

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – भारतीय हिंदू संस्कृती प्रमाणे सुरु होणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बुधवार दि . २२ मार्च रोजी सकाळी ६ वाजता कल्याण पूर्वेत भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .हिंदू नव वर्ष स्वागत यात्रा समिती कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य स्वागत यात्रेचा प्रारंभ श्री गणपती चौक, कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडा पटांगणा जवळील साईबाबा मंदीरा समोर सकाळी ६ वाजता गुढी उभारून करण्यात येणार आहे . ही शोभा यात्रा मुख्य बाजार पेठेतून पुढे जुनी जनता सहकारी बँकेस समोरुन म्हसोबा चौक, तिसगांव रोड मार्गे तिसगांव नाक्यावरून तिसगांवातील तिसाई मंदीराच्या प्रांगणात आल्या नंतर या ठिकाणी यात्रेचा समारोप होणार असून या समारोहात सहभागी संस्था संघटनांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे .या यात्रेदरम्यान पारंपारिक वेशभूषा, सह कुटूंब सहभाग, व्यक्तीशः व्हीडीओ रिल या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेत बासरीवाला ढोल ताशा पथक, गोंधळी, तारकानृत्य, मल्लखांब, तुळस धारी महिला, वारकरी संप्रदायाची विविध मंडळे, सायकल स्वार, स्केटींग, बैलगाड्या यांचे बरोबरच हिंदू संस्कृतीच्या परंपरेचे दर्शन घडविणारे विविध संस्था संघटनांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत .हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या भव्य स्वागत यात्रेत आपल्या पारंपारिक वेशभूषेत तमाम भारतीय नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष आमदार गणपत गायकवाड, स्वागताध्यक्ष संजयशेठ गायकवाड, मनोज राय, कार्याध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, श्रीमती वंदना मोरे, सचिव विष्णू जाधव, अमित सोनवणे आदी पदाधिकार्‍यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे .