Home स्टोरी बीज अंकुरे अंकूरे… ओल्या मातीच्या कुशीत..!

बीज अंकुरे अंकूरे… ओल्या मातीच्या कुशीत..!

310

कळसुलकर प्राथमिक शाळेच्या बालचमूनी केले बीजरोपण व वृक्षारोपणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम.

सावंतवाडी: दिवसेंदिवस उन्हाची वाढणारी दाहकता आणि ढासळत्या पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी उन्हाळी सुट्टीमध्ये कळसुलकर प्राथमिक शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याने काजू ,फणस, आंबा, जांभूळ, पेरू, पपई, चिंच ,चिकू, आवळा अशा अनेक बियांचे संकलन करावे असे शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत सर यांनी सांगितले होते. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी विविध फळबियांचे व झाडांचे संकलन केले. आणि सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर जाऊन शासनाने सुरू केलेला आनंददायी शनिवार या उपक्रमाचे औचित्य साधून १५० विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच वन विभागाचे कर्मचारी श्री. अशोक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीजरोपण व वृक्षरोपण करण्यात आले.

जवळजवळ १५०० बिया व आंबा -१००, जांभूळ -१०० ,पेरू -७५, पपई-५०,चिंच-१००, कोकम- ५०, चिकू -५० इत्यादी झाडे वन विभागाच्या हद्दीत नरेंद्र डोंगरावर ८ ठिकाणी लावण्यात आली. कसूरकर प्राथमिक शाळा असे नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी घेत असते. गेली दहा वर्षे ही शाळा असे उपक्रम राबवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयी प्रेम निर्माण होते.

झाडे लावली पाहिजेत याची जाणीव विद्यार्थ्यांना बालवयात होते. याचा फायदा परिसरातील सर्व प्राणी, पक्षी यांना होतो. त्यामुळे भविष्यातही जास्तीत जास्त बिया व झाडे लावण्याचा मानस शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत सर यांनी व्यक्त केला याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक अमित कांबळे, धोंडी वरक, ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ, संजय आडेलकर, स्मिता घाडीगावकर तसेच वनविभागाचे कर्मचारी श्री अशोक गावडे यांचे मुलांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी, पालक व केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर सर यांचे प्रोत्साहन मिळाले.