Home क्राईम बिहारमध्ये धर्मांध मुसलमानांनी घडवलेल्या दंगलीत हिंदूंची कोट्यवधी रुपयांची हानी ! दुकाने जाळून...

बिहारमध्ये धर्मांध मुसलमानांनी घडवलेल्या दंगलीत हिंदूंची कोट्यवधी रुपयांची हानी ! दुकाने जाळून खाक

54

बिहार: बिहारमध्ये रामनवमीच्या काळात धर्मांधांनी केलेल्या हिंसाचाराची आणि त्यामुळे हिंदूंची झालेली हानी यांविषयीची माहिती पुढे येत आहे. ‘शहरात रामनवमीच्या दिवशी झालेल्या दंगलीत सुमारे ५०-६० धर्मांधांच्या जमावाने हातात पेट्रोल बाँब घेऊन हिंदूंवर आक्रमण केले. हे पेट्रोल बाँब पेटवून त्यांनी हिंदूंची दुकाने आणि गोदाम यांना आग लावून ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली’, अशी माहिती या आक्रमणातील पीडित हिंदूंनी दिली. या दंगलीत हिंदूंची कोट्यवधी रुपयांची हानी झाली. हिंदूंची दुकाने लुटून ती जाळण्यात आली !लोक रामनवमीचा उत्सव साजरा करत असतांना बिहारच्या नालंदा जिल्ह्यात धर्मांधांनी या उत्सवाला विरोध करत हिंसाचार केला. या हिंसारातील एक पीडित उमेश प्रसाद गोस्वामी यांनी सांगितले, ‘माझ्या १० दुकानांची हानी झाली आहे. माझ्या दुकानांतील माल लुटून नेण्यात आला आणि दुकाने जाळण्यात आली. ‘माझी कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे’, असे दुसर्‍या एका पीडित व्यक्तीने सांगितले.

अग्निशमन दल वेळेत पोचले नाही !दुकानांना आग लागल्यानंतर २-३ घंट्यांनी अग्निशमन दल घटनास्थळी पोचले. तोपर्यंत दुकाने जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाची गाडी पाठवण्यासाठी अधिकार्‍यांकडे विनवणी करण्यात आली; मात्र ती वेळेवर पोचले नाही, असे पीडित नागरिकांनी सांगितले. हिंदूंच्या एका मंदिरालाही आग लावण्यात आली.

हिंदूंच्या तक्रारींकडे पोलिसांचे दुर्लक्ष !धर्मांधांनी हिंसाचार चालू केल्याची माहिती मिळताच काही हिंदूंनी साहाय्यासाठी पोलीस ठाणे गाठले; मात्र तेथे त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे पीडितांनी सांगितले.