सिंधुदुर्ग प्रतिनिधी: उद्धव ठाकरे यांनी बारसू येथील जागेसंदर्भात केंद्राला पत्र दिल होतं. त्यामुळे या प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे? अशी चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या नेत्यानी स्थानिकांची बाजू घेतली आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार बारसूच्या संदर्भात माहिती घेत आहेत. या दरम्यान शरद पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी काल चर्चा केली. त्यानंतर आज त्यांनी भेट घेतली. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बारसू येथील स्थानिकांची भेट घेण्यासाठी गेले असताना त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. रानतळे चेकपोस्टवर विनायक राऊत यांची गाडी अडवण्यात आली आहे. बारसू येथे कलम १४४ लागू केलं असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
राजन साळवी यांनी आज ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच. माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी. त्यांच्यावर अन्याय करू नये. अशी मागणी राजन साळवी यांनी केली आहे.