Home स्टोरी बागवे हायस्कुल व तांत्रिक विद्यालय मसुरेचे प्राचार्य किशोर चव्हाण यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

बागवे हायस्कुल व तांत्रिक विद्यालय मसुरेचे प्राचार्य किशोर चव्हाण यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

228

मसुरे प्रतिनिधी: मसुरे एज्युकेशन  सोसायटीचे सर्व पदाधिकारी माझ्या मागे वटवृक्षा प्रमाणे उभे राहिले यामुळेच गेली ३० वर्ष ज्ञानदान व १ वर्ष प्रशासकीय कामकाज यशस्वी रीत्या पूर्ण करू शकलो. संस्था तसेच शाळेला आवश्यक त्यावेळी आपण मार्गदर्शनासाठी उपलब्ध राहीन. मसुरे ग्रामस्थांचे प्रेम, मार्गदर्शन सदैव स्मरणात राहील. असे प्रतिपादन  प्राचार्य किशोर चव्हाण यांनी येथे केले. मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल आणि एम. जी. बागवे तांत्रिक विद्यालयाचे प्राचार्य आयु. किशोर अर्जुन चव्हाण  नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार बागवे हायस्कुल सभागृहात संस्था अध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.  यावेळी अध्यक्ष डॉ. दीपक परब म्हणाले, चव्हाण सर याना विध्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांचे प्रेम लाभले. हे प्रेम सर्वांनाच लाभत नाही. यामुळेच आपल्या गावापासून १ हजार किमी दूर येत चव्हाण सर यशस्वीपणे आपले कार्य पार पाडू शकले. यावेळी मसुरे एज्यूकेशन सोसायटीच्या वतीने चव्हाण सर उभयतांचा सत्कार करण्यात आला.  तसेच बागवे हायस्कूल व एम. जी बागवे तांत्रिक विद्यालय व भरतगड हाय- शिक्षकांच्या वतीने, संस्था अध्यक्ष डॉ. दिपक परब यांनी सुद्धा भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार केला. मान्यवरांनी चव्हाण सर यांच्या बाबत गौरवोद्गार काढले.यावेळी लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, शाळा समिती अध्यक्ष सौ सरोज परब, सुभाष बागवे, राजन परब, विठ्ठल लाकम, शेखर बागवे, डॉ सुधीर मेहेंदळे, मिलिंद प्रभू, नंदू मुळीक, बाबुराव प्रभुगावकर, सौ राधिका परब, रमेश पाताडे, सौ वर्षा चव्हाण, पंढरीनाथ मसुरकर, बबन कांबळी, प्रसाद बागवे, अनिल मेस्त्री, भानुदास परब, डी. पी. पेडणेकर, भरत ठाकूर, एस. डी. बांदेकर, सौ ए. यु. कोदे आदी शिक्षक, पालक विध्यार्थी उपस्थित होते.फोटो: मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल आणि एम. जी. बागवे तांत्रिक विद्यालयाचे प्राचार्य आयु. किशोर अर्जुन चव्हाण यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करताना संस्था अध्यक्ष डॉ दीपक परब बाजूला महेश बागवे, सौ सरोज परब, सौ वर्षा चव्हाण व अन्य