Home शिक्षण बांदिवडेच्या प्रथमेश आईरची नवोदय विद्यालयात निवड!

बांदिवडेच्या प्रथमेश आईरची नवोदय विद्यालयात निवड!

213

मसूरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी येथील कु.प्रथमेश शत्रुघ्न आईर याची नवोदय विद्यालय सांगेली येथे निवड झाली आहे. प्रथमेश हा केंद्र शाळा मसुरे नं 1येथे इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे . त्याला वडील शत्रुघ्न आईर,आई सौ. शामल, शिक्षिका तनुश्री नाबर आणि शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. बांदिवडे विविध कार्य सहकारी सोसायटी सचिव शत्रुघ्न आईर यांचा तो मुलगा आहे. प्रथमेशच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.